स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )
मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा चंद्र, आकाशात …