फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा
एक दिवस सकाळीच प्रचिती ने अजिंक्य ला फोन केला आणि म्हणाली, “आज दहा वाजता न्यूज चॅनल बघ.. तुझ्यासाठी सरप्राइज आहे..” प्रचिती असं काय सरप्राइज देणार आहे हे अजिंक्य ला काही कळालं नाही. त्याने “ठिक आहे नक्की बघतो..” म्हणत उत्तर दिले. त्यालाही आता उत्सुकता लागली होतीच. पटापट आवरून तो शेताकडे चक्कर मारून आला आणि कधी एकदा …