प्रीतबंध- एक अनोखी प्रेमकथा
“प्रीतबंध” ही एक आगळीवेगळी प्रेमकथा मुग्धा आणि समीरच्या प्रेमाची अन् प्रेमातल्या विश्वासाची.
दोघांच्या नात्यात दुरावाही येतो… अनेक चढउतार आणि संकटही येते पण या सगळ्यात प्रेमाची ताकद मात्र वाढतच जाते आणि नात्यांची वीण घट्ट होत जाते.
वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी रोमांचक शहारा अंगावर येतो. कधी तो खचला की ती सावली बनून त्याला धीर देते आणि प्रेमाने सगळ्यांचे मनही जिंकते.

-
Read more: कृष्ण प्रेमी राधिका
नदी किनारी असलेल्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरातील मंदिरात राधा कृष्णाच्या मुर्तीवर कोवळी सुर्य किरणे पडल्याने ती मुर्ती अजूनच उठून दिसत होती. एक वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर भासत होते. सकाळचा मंद गार वारा, पक्षांची किलबिल आणि मंदिरच्या परिसरातालील प्रसन्न वातावरण आणि अधूनमधून होणारा घंटानाद अनुभवत राधिकाच्या चेहऱ्यावर आनंदाची एक वेगळीच छटा उमटली होती…आजचा दिवसही तिच्यासाठी खास होता.…
-
Read more: प्रीत तुझी माझी
सुर्य मावळतीला आला होता.. तांबड्या रंगाच्या छटा क्षितीजावर पसरल्या होत्या.. निळाशार समुद्र या क्षणी अजूनच सुंदर भासत होता.. गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता अन् लाटांचा आवाज मन प्रसन्न करत होता.. मानसीचं मन मात्र आज कशातच रमत नव्हतं. ती एकटीच त्या सुर्याकडे बघत कुठेतरी हरवली होती. पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या..मन…
-
Read more: लग्नगाठ (एक प्रेमकथा)
“आरती, झालीस का गं तयार.. मुलाकडची पाहुणे मंडळी येतीलच इतक्यात..” – आरतीची आई घरात आवराआवर करतच म्हणाली. “हो गं आई.. झाली माझी तयारी..बघ एकदा, साडी नीट जमली आहे ना?” – आरती आईच्या समोर येत म्हणाली. आईने लगेच वळून आरती कडे बघितले तसंच आई म्हणाली, “किती गोड दिसते आहेस गं बाळा..ही साडी अगदी खुलून…
-
Read more: Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_चार_अंतिम
कांदेपोहे कार्यक्रम झाला आणि पाहुणे परत गेले. आता निधीच्या मम्मा पप्पांना तिच्या निर्णयाची उत्सुकता लागली होती. चार दिवस होऊन गेले तरी निधीचा निर्णय काही ठरत नव्हता. तिच्या मनात नुसताच गोंधळ उडाला होता. बराच विचार करून एक दिवस निधीने ठरवलं आज फायनल काय तो निर्णय कळवायचा. निधीच्या मनात विचार आला, “सुजय च्या जागी मी असते…
-
Read more: Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा
निधी फ्रेश होऊन चहा नाश्ता करत असतानाच पाहुण्यांचा फोन आला. “अर्धा तासात आम्ही पोहोचतो” असं पाहुणे मंडळींकडून कळताच मम्मा पप्पांची घाई सुरू झाली. सगळी अरेंज मेंट नीट झाली आहे ना याची खात्री करून घेत मम्मा निधीला म्हणाली, “निधी आता तू तयार हो..काही मदत लागली तर आवाज दे मला..” निधीला मात्र जराही उत्साह वाटत नव्हता.…
-
Read more: Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_दुसरा
ठरल्याप्रमाणे निधी येत्या विकेंड ला मम्मा पप्पांसोबत वेदांतच्या घरी जायला निघाली. तब्बल तीन महिन्यांनी वेदांतला भेटणार म्हणून निधी जाम खुश होती. कधी एकदा त्याला भेटते असं काहीसं झालेलं तिला. बारा तासांच्या प्रवासानंतर तिघेही वेदांत राहतो त्या शहरात पोहोचले. सायंकाळ झाली होती त्यामुळे हॉटेलवर रूम बुक करून तिघांनी तिथे रात्रभर मुक्काम केला आणि दुसर्या…
-
Read more: Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला
“निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली. निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला मिळतं निवांत.. ” “निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?” “मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे…
-
Read more: गण्या (काल्पनिक हास्य कथा)
मोजक्याच वस्तीचे एक लहानसे गाव होते, गावात सगळ्यांचा लाडका असा एक गण्या नामक तरूण राहायचा. त्याचं नाव गणेश पण सगळे लाडाने गण्या म्हणायचे. हा गण्या होता सांगकाम्या, जरा मंद बुद्धीचा शिवाय रातांधळा. गण्या अगदी लहान असताना वडील देवाघरी गेल्याने आई आणि गण्या दोघेच घरी असायचे. गावालगत असलेल्या दोन एकर शेतात मेहनत करून गण्याच्या आईने त्याला…
-
Read more: फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)
ठरल्याप्रमाणे प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत अजिंक्य च्या गावी आली. गाडी गावाजवळ पोहोचताच प्रचिती च्या चेहर्यावर आनंदाची लहर उमटली. तो हिरवागार निसर्ग, अंगाला अलगद स्पर्शून जाणारा गार वारा ती परत एकदा अनुभवत होती. डॅड – “काय मस्त वाटतंय ना इकडे.. कितीतरी वर्षांनी या मोकळ्या हवेत फिरल्या सारखं वाटतंय.. आमचं बालपण अशाच वातावरणात गेलेलं..धमाल मज्जा करायचो…
-
Read more: फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग पाचवा
एक दिवस सकाळीच प्रचिती ने अजिंक्य ला फोन केला आणि म्हणाली, “आज दहा वाजता न्यूज चॅनल बघ.. तुझ्यासाठी सरप्राइज आहे..” प्रचिती असं काय सरप्राइज देणार आहे हे अजिंक्य ला काही कळालं नाही. त्याने “ठिक आहे नक्की बघतो..” म्हणत उत्तर दिले. त्यालाही आता उत्सुकता लागली होतीच. पटापट आवरून तो शेताकडे चक्कर मारून आला आणि कधी एकदा…
-
Read more: फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा
परत मुंबईला जायचं म्हणून प्रचिती ने प्रोजेक्ट रिपोर्ट चे सगळे काम दुपारपर्यंत संपविले. अजिंक्य – “प्रचिती मॅडम, उद्या पासून तुम्ही इथे नसणार…ही रंगिबेरंगी फुले तुम्हाला खूप मिस करणार..एकदा नदीकाठी जाऊन येऊया का?… आठवडाभरात आम्हाला सगळ्यांना तुमची खरंच खूप सवय झाली…” प्रचिती – “अच्छा..फक्त ही फुलेच मिस करणार का मला…मलाही या फुलांची खूप आठवण येईल म्हणून…
-
Read more: फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा
अजिंक्य आणि प्रचिती नदीकिनारी पोहोचले. संथ वाहणारे नदीचे पाणी, आजुबाजुच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल, मंद वाहता गार वारा, वर निळेशार आकाश असं रम्य वातावरण बघताच प्रचिती मनोमन सुखावली. प्रचिती – “काय मस्त वाटतंय ना इथे..इतक्या जवळून पहिल्यांदाच नदी बघते आहे मी..आय जस्ट लव्ह इट..” तिने लगेच बॅग मधून कॅमेरा काढला आणि ते निसर्गसौंदर्य कॅमेरात कैद केलं.…
-
Read more: फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग दुसरा
दारात अजिंक्य ची आई हातात ताट घेऊन उभी.. प्रचिती ने आईंना बघताच तिला जणू लक्ष्मीचा भास झाला.. उंचपुरा बांधा,नीट नेसलेली बारीक किनार असलेली कॉटनची साडी, कपाळावर इवलिशी [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] लालचुटुक टिकली, दोन्ही खांद्यावर पदर, हातात आरतीचे ताट आणि प्रसन्न हसरा चेहरा.…
-
Read more: फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा)- भाग पहिला
“प्रचिती, अगं जाशील ना बरोबर तू एकटी? नाही म्हणजे अगदीच ग्रामीण भागात पहिल्यांदाच जाते आहेस ना म्हणून जरा काळजी वाटली..त्यात तिथे आठवडाभर राहणार, तेही परक्या घरी.. खाण्यापिण्याची नीट सोय होणार की नाही काय माहीत..” प्रचिती ची आई तिला काळजीच्या सुरात प्रश्न विचारत होती. “डोन्ट वरी माय डियर मॉम…मी अगदी व्यवस्थित जाऊन परत येते.. आणि तुला…
-
Read more: अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा
“समिधा…..समिधा……समिधा, अगं लक्ष कुठे आहे तुझं..मी काय विचारतेय? चहा घ्यायला जायचं ना? कोणत्या विश्वात रमली आज ऑफिसला आल्या आल्या..चल पटकन..” समिधा ची मैत्रिण प्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून आवाज देत म्हणाली. प्रियाच्या आवाजाने भानावर येत दचकून समिधा म्हणाली, “अ..हो..हो..जाऊया ना..चल… अगं नकळत विचारांमध्ये अशी गुंतले की कळालच नाही तू कधी आलीस ते..” दोघीही चहा घ्यायला…