June 2019

पहिल्या प्रेमाची पहिली भेट..??

तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का.  अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या …

पहिल्या प्रेमाची पहिली भेट..?? Read More »

स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..

ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून. आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी, …

स्वतः साठी जगायचे राहूनच गेले.. Read More »

जन पळभर म्हणतील हाय हाय….

जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय ? कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्‍या आहेत. सखेसोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील, बसतील, हसुनि खिदळतील, मी जातां त्यांचें काय जाय ? अगदी खरंय, …

जन पळभर म्हणतील हाय हाय…. Read More »

म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम

पंचाहत्तरी ओलांडलेले म्हातारे आजोबा तासाभरापासून बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला बसले होते, त्यांच्या जवळ एक गाठोडे होते. कितीतरी वेळाने बस आली, आजोबा कसेबसे गाठोडे सांभाळत बसमध्ये चढले आणि कंडक्टर च्या बाजुला बसले. कंडक्टर तिकीट काढून आल्यावर आजोबांनी ही तिकीट घेतले. गाठोडे बघून कंडक्टर ने मोठ्या उत्सुकतेने विचारले “काय आजोबा, गाठोड्यात काय माल आहे.. ” आजोबा …

म्हातारा म्हातारी आणि त्यांच्यातलं निरागस प्रेम Read More »

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम )

मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे. दोघेही पार्कींग कडे निघाले. अदितीला जरा अवघडल्या सारखे वाटत होते पण अविनाश तिला कंफर्टेबल करण्याचा प्रयत्न करीत होता. कार मधून दोघेही …

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग ३ ( अंतिम ) Read More »

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग २

मागच्या भागात आपण पाहीले की ऑफिस मध्ये उशीर झाल्याने आणि पाऊस सुरू असल्यामुळे अविनाश अदितीला घरी सोडतो म्हणाला, जरा आढेवेढे घेत ती त्याच्या सोबत जायला तयार झाली. दोन वर्षांनंतर आज ते भेटलेले. आता पुढे. दोन वर्षांपूर्वी अदिती मुलाखतीसाठी आलेली तेव्हा बाहेर असाच जोरात पाऊस सुरू होता, त्यामुळे तिला जरा उशीर ही झाला होता. लगबगीने ती …

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग २ Read More »

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १

अदिती ऑफिसमधून निघणारच होती पण बघते तर काय बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ती बाहेर बघत जरा चिडचिड करत मनातच पुटपुटली, “नेमकी मी छत्री ☔ विसरते त्याच दिवशी पाऊस येतो. आधीच कामामुळे उशीर आणि त्यात हा पाऊस…? कधी थांबतो कुणास ठाऊक….चला तोपर्यंत कॉफी तरी घेऊया.. तितकाच काय तो वेळ जाईल..” अदिती कॉफी घ्यायला निघाली आणि …

कॉफी आणि बरंच काही… गोष्ट एका प्रेमाची… भाग १ Read More »

अशीही एक सावित्री…

“मॅडम, इधर क्या करने आयी है..अच्छे घर की लग रही..ये रेड लाइट एरिया है..पता है ना..” एक लाल भडक लिपस्टिक लावलेली , जरा विचित्र पोझ देत उभी असलेली, तोडके कपडे घातलेली एक चाळीशीतली स्त्री सविता कडे बघत बोलली. सविता तिच्या कडे किळसवाण्या नजरेने बघत इच्छा नसताना उत्तरली, “अहो बाई, माझा नवरा शाम, सारखा इकडे येतो …

अशीही एक सावित्री… Read More »

बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी

मीनूची शाळा सुटली आणि बाहेर येताच नेहमीप्रमाणे आई वेळेआधीच घ्यायला आलेली होती. धावत येऊन आईला मिठी मारत मीनू म्हणाली, “आई, माझा बाबा कुठे आहे गंं.. ते बघ तिकडे सानूचे बाबा आलेत तिला घ्यायला, सगळ्यांचे आई बाबा असतात ना..मग माझा बाबा कुठे आहे आई.‌..मी बाबांना फक्त फोटोतच बघितलं.. बाबा का येत नाही आपल्या जवळ..” मीनूच्या अशा …

बाबा अमर आहेत- सैनिकाच्या कुटुंबाची कहाणी Read More »

तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली )

तिला काही सांगायचंय.. हो.. खरंच खूप काही सांगायचंय पण शब्द मात्र सापडत नाहीये…अशीच घुसमट होत असते प्रत्येक स्त्रिच्या मनाची. लाडात कौतुकात वाढलेली ती जसजशी मोठी होत जाते तसंच तिच्या मनाची घुसमट सुरू होते. काही घरांमध्ये मुलीच्या शिक्षणावर खर्च कशाला म्हणून ती तिची इच्छा असूनही अर्ध्यावर शिक्षण सोडून आई वडील म्हणतील तसं भविष्य स्विकारते. शिक्षण मनाप्रमाणे …

तिला काही सांगायचंय… ( घुसमट स्त्रियांच्या मनातली ) Read More »

रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा..

रखमा उंच बांध्याची, सावळी पण नाकी डोळी तरतरीत. जशीच वयात यायला लागली, तसंच नकळत्या वयात घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कसं बसं आठवीपर्यंत शिकली होती ती, पुढे शिकायचं म्हणाली पण ऐकतयं कोणं. मागासलेला समाज, ग्रामीण वातावरण, मुलगी शिकली की हाताबाहेर जाते तेव्हा लवकर लग्न लावून दिलं की जबाबदारी संपली अशा विचारांचे सगळे. कोवळ्या वयात तिच्यावर …

रखमाचा लढा, आर्थिक स्वावलंबनाचा धडा.. Read More »

Free Email Updates
We respect your privacy.