चिंब भिजलेले…(प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी )
नैना धावपळ करीत रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोहोचली पण बघते तर काय पावसामुळे प्लॅटफॉर्म गर्दीने इतके भरलेले की आता आठ वाजताची लोकल मिळण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. नैना ने चौफेर नजर फिरवली तर जो तो घरी पोहोचण्यासाठी लोकल येण्याच्या दिशेने बघत स्वतःची बॅग, पर्स सांभाळत लोकल पकडण्याच्या तयारीत. संततधार धो धो पाऊस सुरूच त्यामुळे वातावरण थंडगार …