प्रीतबंध- एक अनोखी प्रेमकथा
“प्रीतबंध” ही एक आगळीवेगळी प्रेमकथा मुग्धा आणि समीरच्या प्रेमाची अन् प्रेमातल्या विश्वासाची.
दोघांच्या नात्यात दुरावाही येतो… अनेक चढउतार आणि संकटही येते पण या सगळ्यात प्रेमाची ताकद मात्र वाढतच जाते आणि नात्यांची वीण घट्ट होत जाते.
वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी रोमांचक शहारा अंगावर येतो. कधी तो खचला की ती सावली बनून त्याला धीर देते आणि प्रेमाने सगळ्यांचे मनही जिंकते.

-
Read more: होम मिनिस्टर तू या घरची…
गौरव घरी आला तसंच त्याचा उदास चेहरा बघून प्रियाने ओळखले की आज नक्कीच काहीतरी बिघडलंय. ऑफिसमधून घरी येताच नेहमी तो सोफ्यावर बॅग फेकत दोन्ही मुलांसोबत अगदी लहान होऊन खेळायला लागतो पण आज मात्र हातातली बॅग अगदी व्यवस्थित जागेवर ठेवून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोच दोन्ही मुले बाबांना आपले कारनामे दाखवायला बाथरूमच्या दारापाशी…
-
Read more: नव्याने जन्मलेली तिच्यातली ‘ ती ‘
शुभदा आजही नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून धावपळ करत मुलांचा, नवर्याचा डबा बनवून मुलांना तयार करत होती. तितक्यात मुलगी म्हणाली, “आई माझी ड्राॅइंग बूक दिसत नाही.. कुठे आहे शोधून दे ना..” धावपळ करत कशीबशी मुलीची ड्रॉइंग बूक शोधली तसाच नवर्याचा सूर कानावर पडला. रात्रीच सगळं शोधून आवरून ठेवायला काय होते. शाळेची बॅग आदल्या दिवशी…
-
Read more: संदेशे आते हैं ( सैन्यात असलेल्या भावाला बहिणीचे पत्र )
प्रिय दादा, रक्षाबंधनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ? यावर्षीही आपण रक्षाबंधनाच्या दिवशी सोबत नाही पण तुझी आठवण सदैव माझ्या मनात आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधून माझी रक्षा कर असं सांगते पण तू तर मला बालपणापासूनच स्वतःची रक्षा कशी करायची याचे धडे देत आलास. कदाचित तुझ्या बालपणीचं तू सैन्यात जाण्याचं ठरवलं असावं आणि…
