प्रीतबंध- एक अनोखी प्रेमकथा
“प्रीतबंध” ही एक आगळीवेगळी प्रेमकथा मुग्धा आणि समीरच्या प्रेमाची अन् प्रेमातल्या विश्वासाची.
दोघांच्या नात्यात दुरावाही येतो… अनेक चढउतार आणि संकटही येते पण या सगळ्यात प्रेमाची ताकद मात्र वाढतच जाते आणि नात्यांची वीण घट्ट होत जाते.
वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी रोमांचक शहारा अंगावर येतो. कधी तो खचला की ती सावली बनून त्याला धीर देते आणि प्रेमाने सगळ्यांचे मनही जिंकते.

-
Read more: आठवणी पावसाच्या… बालपणीच्या…
“ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा… पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा…” हे बालगीत ऐकण्यात अख्खं बालपण गेलं. आजही पावसाळ्याचे वेध लागले की हिच कविता मनात कुठेतरी गुणगुणायला होते, आता तर माझ्या लहान मुलीमुळे परत एकदा त्या बालपणात शिरून हि कविता ऐकायला, बघायला मज्जा येते. रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस आला की येणारा मातीचा…
-
Read more: स्वतः साठी जगायचे राहूनच गेले..
ईशा स्वभावाने हळवी, दिसायला सुंदर, नाजूक चेहरा, लांबसडक केस, गव्हाळ वर्ण आणि सर्व गुण संपन्न मुलगी. जितकी घरकामात तरबेज तितकीच कला तिच्या हातात. सुरेख रांगोळ्या, तिच्या हातच्या जेवणाची चव कुणालाही तृप्त करेल अशीच. घर सजावट असो किंवा बाहेरचे व्यवहार अगदी उत्तम रित्या सांभाळायची ती. ग्रॅज्युएशन झालं तेही डिस्टिंगशन मिळवून. आई वडीलांची लाडकी लेक, घरात मोठी,…
-
Read more: जन पळभर म्हणतील हाय हाय….
जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय ? कवी भा. रा. तांबे यांनी या कवितेतून किती सुंदर शब्दात जीवन मृत्युचे मृत्युचे कटू सत्य सांगितले आहे ना…याच कवितेतील खालील ओळी तर मनाला भिडणार्या आहेत. सखेसोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील, उठतील, बसतील, हसुनि खिदळतील, मी जातां त्यांचें काय जाय ? अगदी खरंय,…
