प्रीतबंध- एक अनोखी प्रेमकथा

“प्रीतबंध” ही एक आगळीवेगळी प्रेमकथा मुग्धा आणि समीरच्या प्रेमाची अन् प्रेमातल्या विश्वासाची.

दोघांच्या नात्यात दुरावाही येतो… अनेक चढउतार आणि संकटही येते पण या सगळ्यात प्रेमाची ताकद मात्र वाढतच जाते आणि नात्यांची वीण घट्ट होत जाते.

वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी रोमांचक शहारा अंगावर येतो. कधी तो खचला की ती सावली बनून त्याला धीर देते आणि प्रेमाने सगळ्यांचे मनही जिंकते.

Buy Link: Amazon

Kobo

Flipkart

  • संजय आणि अजय एकाच ऑफिसमध्ये कामाला..जीवाभावाची मैत्री दोघांमध्ये. दररोज ऑफिसला‌ पोहोचताच सोबत चहा नाश्ता नंतर कामाला सुरुवात असं ठरलेलंच.. आज संजयला यायला जरा उशीर झाला. पण जसा संजय ऑफिसमध्ये पोहोचला तसंच अजयने त्याला घेरलं आणि म्हणाला, “चल रे पटकन..जाम भूक लागलीय.. नाश्ता करून येऊ..” होकारार्थी मान हलवत संजय त्यांच्यासोबत जायला निघाला..आज खूप अस्वस्थ दिसत होता…

    Read more: संसाराचे ब्रेकअप
  • सुमित्राच्या अंगात ताप भरलेला होता, अशक्तपणा मुळे हात पाय गळल्यासारखे वाटत होते‌ पण घरात कुणी साधं तिला का झोपून आहेस हेही विचारत नव्हते. कशीबशी उठून ती पाणी प्यायली आणि  नवर्‍याला फोन केला पण त्याने सांगितले की आता दवाखान्यात येणे शक्य नाही, कामात व्यस्त आहे. इतर कुणाकडून तर अपेक्षा ठेवणे चुकीचे असा विचार करून ती एकटीच…

    Read more: उशीरा का होईना पण ती नाही म्हणायला शिकली..
  • रीमा आई वडीलांना एकुलती एक मुलगी, गव्हाळ वर्ण असलेली पण नाकी डोळी नीटस, उंच बांधा, आकर्षक शरीरयष्टी, काळेभोर लांबसडक केस, जरा मेकअप केला की एखाद्या अभिनेत्रीला मागे टाकेल असं तिचं सौंदर्य. पण या सौंदर्यावर ‘कोड’ पसरलं आणि परिस्थिती बदलली. रीमा लहानपणापासून नृत्य कलेत तरबेज. जणू नृत्य आणि मॉडेलिंग तिला जन्मताच मिळालेली देणगी. कुठलाही क्लास न…

    Read more: तिच्या सौंदर्याचे कोड
  • “अय्या हीच का मोना, पंजाबी ड्रेस घालून आली लग्नात. होणार्‍या सासरची मंडळी भेटतील तर साडी नेसून जावं इतकं कसं कळत नसेल तिला. तुझी सून आतापासूनच मर्यादा ओलांडत आहे बघ रमा. तू तर म्हणाली होती की मुलगी संस्कारी घरातील आहे म्हणून. ” सुजयच्या काकू त्याच्या आईला म्हणाल्या. सुजयच्या आईला ते ऐकून जरा अपमानास्पद वाटले. त्यांनी मोना…

    Read more: कपड्यांवरून व्यक्तीमत्व ठरविणे- योग्य की अयोग्य
  • रविवार असल्याने पूजाला कॉलेज ची गडबड नव्हती, निवांत बसून फोन बघत बसलेली. मध्येच हसत , चाटींग करत होती. आईने दोन तीन वेळा आवाज दिला “पूजा आता फोन बाजूला ठेव आणि लवकर आंघोळ कर, आवर लवकर. सुट्टी आहे म्हणून नुसता फोन घेऊन बसू नकोस मला जरा मदत कर. त्यावर पूजा म्हणाली ” आई, अगं किती ओरडतेस,…

    Read more: नात्यात स्पेस का हवी? हवी का?
  • लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही पतीराजांच्या आजोळी गेलेलो. राज्य महामार्गाला लागूनच वसलेले एक गाव, महामार्गाच्या आजूबाजूला शेती, जवळच वस्ती. आजोळी घरच्या शेतात मोठमोठ्या विहीरी, गर्द हिरवी आंब्याची झाडे, जवळच नविन झालेलं एक भलं मोठं धरण असा निसर्गरम्य परिसर. मोठ्या उत्सुकतेने आम्ही सगळे घरापासून दुचाकींवरून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेलो. लहानपणापासून राहणं, शिक्षण हे बर्‍यापैकी शहरी वातावरणात…

    Read more: रहस्य त्या तीव्र वळणावरचे.. ( रहस्यकथा )
  • आई….या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत.ती घरात असेल तर घराला घरपण असतं. घरातील प्रत्येकाची काळजी आईला असते. स्वयंपाकघरातील जबाबदारी पासून मुलांचा अभ्यास, पतीच्या सगळ्या गरजा, मुलांचे संगोपन, घरातल्या सगळ्या गोष्टींचे मॅनेजमेंट आईकडे असते. सकाळच्या नास्तापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत घरातील प्रत्येकाची आवड लक्षात घेऊन स्वयंपाक बनवताना ती स्वतःची आवड बाजूला ठेवते. मुलांच्या शाळा, पतीच्या आॅफीसच्या वेळेनुसार…

    Read more: आई- मातृदिन विशेष
  • दादाला संपदाची अवस्था बघवत नव्हती. लवकरच काही तरी करायला पाहिजे असा विचार करून अजितला भेटायचं दादाने ठरवलं. संपदाला याविषयी काही कळायला नको म्हणून पुरेपूर काळजी घेतली. तिच्या आई बाबांना वाटलं परिक्षा जवळ आली म्हणून अभ्यासाच्या काळजीने संपदा गप्प गप्प असेल, पण इकडे तिच्या मनात बराच गोंधळ उडाला होता. आता पुढे. दादाने अजितचा फोटो नंबर मिळवून…

    Read more: प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग ३
  • मागच्या भागात आपण पाहीले की संपदा अजित सोबत कॉफी घ्यायला जाण्यासाठी तयार होते. अजित संपदाच्या कॉलेज जवळ तिची वाट बघत असताना ती दिसताच तिचं रूप पाहून घायाळ होतो. ती जवळ‌ येऊन “हाय” म्हणताच अजित भानावर येतो. आता पुढे ? अजितच्या बाइक वरून दोघेही एका कॉफी शॉप मध्ये जायला निघाले. बाइकवर आधार म्हणून तिने नकळत अचानक…

    Read more: प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग २
  • संपदा एक साधारण कुटुंबात वाढलेली गोड मुलगी, दिसायला साधारण पण चेहऱ्यावर आत्मविश्वास, साधं राहणीमान, उंच बांधा, गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, हसरा चेहरा तिला शोभून दिसायचा. वडील सरकारी नोकरीत कामाला, आई गृहिणी, भाऊ प्रायव्हेट नोकरीला. संपदाचं कॉमर्स पदवी अभ्यासक्रमात शेवटचं वर्ष. घरापासून कॉलेज पर्यंत बसने प्रवास करायची. अजितची गाडी बंद पडल्याने तोही आज बसने ऑफिसमध्ये जायला‌…

    Read more: प्यार हुआ चुपके से ( प्रेमकथा) – भाग १
  • मागच्या भागात आपण पाहीले की शामरावांनी आत्महत्या केल्यावर सुमित्राला संसाराचा गाडा चालवताना अनेक खस्ता खाव्या लागल्या त्यात काही वर्षांनी आजीही गेली. होती नव्हती ती जमिन कर्ज फेडण्यासाठी विकावी लागली. सुमित्रा आता दोन मुलांना घेऊन दुसर्‍यांकडे शेतीचे, कुणाच्या घरचे घरकाम करून संसार चालवत होती. गणेश म्हणजेच सुमित्राच्या मुलाला आईच्या कष्टाची जाणीव होती. आई मी शाळेत जाण्यापेक्षा…

    Read more: तिमीरातूनी तेजाकडे..भाग २
  • पाच वर्षांचा गणेश आणि इवल्याशा सव्वा वर्षाच्या दुर्गाला सुमित्राच्या पदरात टाकून शामरावांनी आत्महत्या केली. जेमतेम दोन एकर शेती, त्यात ही पिके पाहिजे तशी आली नाही, डोक्यावर कर्ज. कसं बसं दोन वेळा पोटात अन्न जाई. शेताजवळ एका झोपडीत गणेश, दुर्गा, शामराव, सुमित्रा आणि म्हातारी आजी राहायचे. शामराव अचानक गेल्याने घरावर संकट कोसळले. सुमित्रा झाल्या प्रकाराने हादरली,…

    Read more: तिमीरातूनी तेजाकडे..भाग १
  • गौरी नेहमीप्रमाणे सकाळी उठून फिरायला निघाली. दररोज सकाळी सहा ते सात मॉर्निंग वॉक हे ठरलेलेच. सोसायटीच्या जवळ एक बाग होती,‌तिथे दहा राऊंड मारले की योगा‌ करून सात वाजता घरी परत असा हा मॉर्निंग वॉक चा कार्यक्रम असायचा. त्या दिवशी मात्र काही तरी वेगळंच घडलं. गौरी बाहेर पडली तेव्हा छान गार वारा सुटला होता, “अहाहा! किती…

    Read more: भूलभुलैया ( लघुकथा )
  • संपतराव पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित माणूस, गावाच्या मधोमध भला मोठा वाडा, कामाला चोवीस तास गडी माणसं, इतक्या मोठ्या वाड्यात संपतराव, पत्नी सीमा, दहा वर्षांची मुलगी शालिनी , लहान भाऊ गणेश आणि खाटेवर आजारी संपतरावांची आई राहायचे. सोबतीला आई साहेबांच्या सेवेत कमला असायचीच. गावात त्यांची शेती होती आणि गणेश शेतीच्या कामाचा हिशोब बघायचा, सीमा वाड्यावर काय…

    Read more: एक वाडा झपाटलेला ( भयकथा)
  • अमन रीता शुद्धिवर येण्याची वाट पाहत होता, ती लवकरच बरी होणार अशी त्याला खात्री होती. कितीही खर्च आला तरी चालेल, काहीही करून रीताला बरं करायचे अशी त्याची धडपड सुरू होती. डॉक्टर सुद्धा शक्य ते प्रयत्न करत होते. अमनचा त्याच्या प्रेमावर विश्वास होता पण नियतीच्या मनात नेमके काही वेगळेच होते. दोन आठवडे होत आले , उपचार…

    Read more: अधुरी प्रेम कहाणी- भाग २