प्रीतबंध- एक अनोखी प्रेमकथा

“प्रीतबंध” ही एक आगळीवेगळी प्रेमकथा मुग्धा आणि समीरच्या प्रेमाची अन् प्रेमातल्या विश्वासाची.

दोघांच्या नात्यात दुरावाही येतो… अनेक चढउतार आणि संकटही येते पण या सगळ्यात प्रेमाची ताकद मात्र वाढतच जाते आणि नात्यांची वीण घट्ट होत जाते.

वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी रोमांचक शहारा अंगावर येतो. कधी तो खचला की ती सावली बनून त्याला धीर देते आणि प्रेमाने सगळ्यांचे मनही जिंकते.

Buy Link: Amazon

Kobo

Flipkart

  •    रीता दिसायला सुंदर, बडबडी, मनमोकळ्या स्वभावाची, हुशार मुलगी. तिला गाण्याची खूप आवड त्यामुळे कॉलेज मध्ये एक उत्तम गायिका म्हणून तिची ओळख व्हायला फार वेळ लागला नाही. तिचं सौंदर्य आणि गोड आवाज यामुळे बरेच जण तिच्यावर फिदा.अमन एक देखणा, शांत स्वभावाचा , स्वतःच्या विश्वात रममाण असणारा पण उत्तम Guitar वादक. त्याच्या शांत स्वभावामुळे त्याचे मोजकेच…

    Read more: अधुरी एक कहाणी -भाग १
  •    रीमाच्या शेजारी एक नवविवाहित जोडपे राहायला आले. बिल्डिंग मध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतील असे हे जोडपे अनघा आणि अनिकेत. अनघा अतीशय सुंदर, उंच सडपातळ बांधा, गोरा वर्ण ,नक्षिदार डोळे, छानसा तिला शोभेसा हेअरकट. अनिकेत सुद्धा एकदम रूबाबदार देखणा , अगदीच हॅंडसम.रीमा‌ एक गृहिणी, नवरा आणि दोन मुलांबरोबर आनंदात राहत होती. चांगली शिकलेली होती पण…

    Read more: दिसतं तसं नसतं..
  • तो रविवार, कधी न विसरता येणारा?सकाळी ११ वाजता दोघ भेटायच ठरलं. रात्रीपासूनच तिच्या मनात अनेक प्रश्न गोंधळ घालायला लागले. उद्या भेटल्यावर काय काय बोलायच, तो माझ्या अपेक्षेत बसणारा असेल का, त्याला अपेक्षित मुलगी मी असेल का, अस एका भेटीत त्याचे व्यक्तीमत्व मला ओळखता येयील का.  अशापकारचे प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते कारण ते दोघे घरच्यांच्या…

    Read more: पहिली भेट
  • अमेय आज खूप अस्वस्थ होता. पर्यटकांकडे त्याचं फारसं लक्ष लागत नव्हतं. काही दिवस असेच गेले. एक दिवस अचानक विदेशी नंबर वरून त्याला फोन आला , त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, तो मनापासून आनंदी होता. जणू तो त्याचं गोष्टींची वाट बघत होता. अमेय एक देखणा, उंच बांध्याचा तरूण असून पर्यटकांचा मार्गदर्शक होता. सुशिक्षित असल्याने, इंग्रजी चांगले बोलत असल्याने…

    Read more: देशी अमेय विदेशी जेसिका
  • अर्णव रात्री ऑफीसमधून घरी येत होता. कामामुळे ऑफीसमध्ये उशीर झाल्याने बाहेर सगळीकडे शांतता पसरली होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो जरा वेगात गाडी चालवत घरी निघाला. अचानक कुणीतरी रस्ता ओलांडताना मधे आले, त्यानं कशीबशी गाडी थांबवली पण धक्क्याने ती व्यक्ती खाली पडली. तो घाबरला, गाडीबाहेर येऊन बघतो तर एक तरुणी बेशुद्ध पडली होती. मागुन येणारी…

    Read more: प्रेमकथा
  • सकाळी लवकर उठून ती लगबगीने बाथरूम मधे गेली आणि किंचित गोंधळलेल्या अवस्थेत नवर्‍याला उठवत म्हणाली “तुम्हाला या किट वर किती लाईन्स दिसत आहे?”.तो : (अर्धवट झोपेत डोळे चोळत) एकच लाइन दिसते आहे.  ती : (पुटपुटत) मला तर दुसरी अंधुक लाईन पण दिसते आहे.. तुम्ही बघा ना नीट. तो : एक काम कर, ती किट ठेव…

    Read more: आई होण्याचा नाजूक अनुभव…. गरोदरपणातील काळजी
  •     आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव आहे. नऊ महिने पोटात वाढवून बाळ जन्माला आले की बाळाला बघून सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.स्तनपान म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील अतुट नातं, आईच्या स्पर्शाने बाळाला एक प्रकारे सुरक्षित वाटत असते, आईची उब मिळाली की बाळाला शांत आणि सुरक्षित जाणिव होते. अशा या सुंदर अनुभवात breast…

    Read more: Breast Abscess- स्तनपान करताना येणारी मोठी समस्या- एक थरारक अनुभव
  • सरकारी नियमानुसार ६ महीने maternity leave. ऐकुनच छान वाटले जेव्हा बाळ होणार म्हणून रजेवर जायची वेळ जवळ आली. एकूण परिस्थिती बघून अपेक्षित तारखेच्या तीन आठवडे आधी रजा सुरू झाली आणि मग उत्सुकता लागली बाळाच्या येण्याची. आपले बाळ कसे दिसत असेल, कधी त्रास होऊ लागला तर काय करायचे अशा प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू झाला. काही दिवसांतच एका…

    Read more: आई, बाळ आणि नोकरी
  • तनूची चौथीची परिक्षा संपली आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. ती आईला म्हणाली “आई, काही दिवस आॅफिसमध्ये सुट्टी घे ना‌ गं, कुठे तरी बाहेर जाऊया फिरायला, बाबांना म्हण ना. तुम्ही दोघे आॅफिसला गेल्यावर खूप बोअर होते मला. उन्हामुळे खेळायला ही जाता येत नाही. नाही तर समर कॅम्प ला जावू का मी. माझा जरा वेळ जाईल त्यात.”…

    Read more: इंटरनेटच्या काळात हरवलेली उन्हाळ्याच्या सुट्टीतली मज्जा
  • शाळेच्या परिक्षेचा शेवटचा दिवस, उड्या मारत घरात पाऊल टाकताच स्कूल बॅग सोफ्यावर फेकून निधी आनंदाने आईला बिलगुन म्हणाली “आई, आज मस्त काही तरी बनव रात्री जेवायला. मला आता सुट्टी..आज आमची लास्ट डे पार्टी होती क्लास मध्ये.. आम्ही मस्त गेम्स खेळलो..टीचर सोबत फोटो काढले.. खूप खूप मज्जा आली..आता दोन महिने अभ्यास नाही..शाळा नाही.. मज्जाच मज्जा..????”. आई…

    Read more: मुलांची सुट्टी आणि आईची परिक्षा
  • “आई बघ ना‌ गं , दादा मला कशालाच हात लावू देत नाही.” इवलासा विनय आई जवळ अमनची तक्रार करत होता. आई स्वयंपाकघरातून आवाज देत म्हणाली “अरे अमन, तू मोठा आहेस ना. कशाला‌ त्रास देतोस त्याला. घेऊ दे ना‌ जरा वेळ काय पाहिजे ते. किती भांडता दोघे.” अमन खोलीतून ओरडला “आई, मीच का गं समजून घ्यायचे…

    Read more: मुलांमधील गैरसमज.. धोक्याची घंटा..
  • एखादी स्त्री जेव्हा आई होते, त्यानंतर बाळाशी निगडित बर्‍याच विषयावर आईचे वाचन, संशोधन सुरू होते. अशातच माझ्या वाचनातून गेलेला एक विषय म्हणजे “ADHD- Attention Deficit Hyperactivity Disorder”. ADHD नक्की काय आहे हे सोप्या शब्दात जाणून घेऊया. ही एक अशी स्थिती आहे ज्यात मुलांना एका ठिकाणी लक्ष केंद्रित करणे कठीण जाते, एक काम पूर्ण होण्याआधीच दुसरा…

    Read more: ADHD- पाल्यांमधील एक समस्या
  • मागच्या भागात आपण पाहीले की मैथिलीच्या वाढदिवसानिमित्त अमनने काही तरी सरप्राइज प्लॅन केला होता. ते कळाल्यापासून काही केल्या मैथिलीला रात्री झोप लागत नव्हती. उद्या नक्की काही तरी विचित्र होणार आहे असं तिचं मन तिला सांगत होतं. अमन कडे बघून आनंद होत असला तरी एक धडधड तिला बेचैन करत होती. विचार करतच कशी बशी ती झोपी…

    Read more: हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – अंतीम भाग
  • मागच्या भागात आपण पाहीले की अमन मैथिलीच्या घरी गेला हे ऐकून तिला काळजी वाटत होती की आई बाबा त्याला भूतकाळाविषयी काही सांगतील का. अशातच नकळत तिचा आणि अमन‌चा पाच वर्षांचा संसार तिच्या डोळ्यापुढे आला. मैथिली आई वडीलांना एकुलती एक, दिसायला सुंदर, घरकामात तरबेज, शिकलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. मैथिलीला नोकरी मिळाल्यापासून आई वडिलांसोबत पुण्यातच राहायची, वडील सरकारी…

    Read more: हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग २
  • मैथिली आणि अमन, दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण घरात मात्र पाळणा हलत नव्हता. बरेच प्रयत्न, सतत दवाखाना, अनेक टेस्ट करून काही हाती लागत नव्हते. आज बरीच आशा मनात ठेवून दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले, दोघांच्याही काही टेस्ट दोन दिवसांपूर्वी केल्या होत्या आणि त्याचे रिपोर्ट काय येतील त्यानुसार पुढे काय करायचे ठरणार होते. मैथिलीच्या मनात अनेक विचारांनी…

    Read more: हरवलेले आईपण…( एक प्रेमकथा ) – भाग १