Love story

प्रीत तुझी माझी

सुर्य मावळतीला आला होता..   तांबड्या रंगाच्या छटा क्षितीजावर पसरल्या होत्या..   निळाशार समुद्र या क्षणी अजूनच सुंदर भासत होता..   गार वारा हळूच अंगाला स्पर्शून जात होता अन् लाटांचा आवाज मन प्रसन्न करत होता..   मानसीचं मन मात्र आज कशातच रमत नव्हतं. ती एकटीच त्या सुर्याकडे बघत कुठेतरी हरवली होती. पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या..मन …

प्रीत तुझी माझी Read More »

लग्नगाठ (एक प्रेमकथा)

“आरती, झालीस का गं तयार.. मुलाकडची पाहुणे मंडळी येतीलच इतक्यात..” – आरतीची आई घरात आवराआवर करतच म्हणाली.   “हो गं आई.. झाली माझी तयारी..बघ एकदा, साडी नीट जमली आहे ना?” – आरती आईच्या समोर येत म्हणाली.   आईने लगेच वळून आरती कडे बघितले तसंच आई म्हणाली, “किती गोड दिसते आहेस गं बाळा..ही साडी अगदी खुलून …

लग्नगाठ (एक प्रेमकथा) Read More »

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_चार_अंतिम

कांदेपोहे कार्यक्रम झाला आणि पाहुणे परत गेले. आता निधीच्या मम्मा पप्पांना तिच्या निर्णयाची उत्सुकता लागली होती. चार दिवस होऊन गेले तरी निधीचा निर्णय काही ठरत नव्हता. तिच्या मनात नुसताच गोंधळ उडाला होता. बराच विचार करून एक दिवस निधीने ठरवलं आज फायनल काय तो निर्णय कळवायचा.   निधीच्या मनात विचार आला, “सुजय च्या जागी मी असते …

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_चार_अंतिम Read More »

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा

निधी फ्रेश होऊन चहा नाश्ता करत असतानाच पाहुण्यांचा फोन आला. “अर्धा तासात आम्ही पोहोचतो” असं पाहुणे मंडळींकडून कळताच मम्मा पप्पांची घाई सुरू झाली. सगळी अरेंज मेंट नीट झाली आहे ना याची खात्री करून घेत मम्मा निधीला म्हणाली, “निधी आता तू तयार हो..काही मदत लागली तर आवाज दे मला..”   निधीला मात्र जराही उत्साह वाटत नव्हता. …

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_तिसरा Read More »

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_दुसरा

ठरल्याप्रमाणे निधी येत्या विकेंड ला मम्मा पप्पांसोबत वेदांतच्या घरी जायला निघाली.   तब्बल तीन महिन्यांनी वेदांतला भेटणार म्हणून निधी जाम खुश होती. कधी एकदा त्याला भेटते असं काहीसं झालेलं तिला.   बारा तासांच्या प्रवासानंतर तिघेही वेदांत राहतो त्या शहरात पोहोचले. सायंकाळ झाली होती त्यामुळे हॉटेलवर रूम बुक करून तिघांनी तिथे रात्रभर मुक्काम केला आणि दुसर्‍या …

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_दुसरा Read More »

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला

“निधी, उठ अगं..लवकर आवरायला हवं आज..” – आई निधीला उठवत म्हणाली.   निधी त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली, “मम्मा, काय गं..थोडा वेळ झोपू दे ना.. रविवारीच जरा झोपायला‌ मिळतं निवांत.. ”   “निधी, अगं तुला बघायला पाहुणे येणार आहेत आज..विसरलीस का?”   “मम्मा, आहे गं लक्षात…आणि हो, पप्पांची इच्छा आहे म्हणून हे बघण्याचा कार्यक्रम वगैरे …

Soulmate_एक_प्रेमकथा #भाग_पहिला Read More »

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम)

ठरल्याप्रमाणे प्रचिती तिच्या मॉम डॅड सोबत अजिंक्य च्या गावी आली. गाडी गावाजवळ पोहोचताच प्रचिती च्या चेहर्‍यावर आनंदाची लहर उमटली. तो हिरवागार निसर्ग, अंगाला अलगद स्पर्शून जाणारा गार वारा ती परत एकदा अनुभवत होती. डॅड – “काय मस्त वाटतंय ना इकडे.. कितीतरी वर्षांनी या मोकळ्या हवेत फिरल्या सारखं वाटतंय.. आमचं बालपण अशाच वातावरणात गेलेलं‌‌..धमाल मज्जा करायचो …

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग सहावा (अंतिम) Read More »

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा

परत मुंबईला जायचं म्हणून प्रचिती ने प्रोजेक्ट रिपोर्ट चे सगळे काम दुपारपर्यंत संपविले. अजिंक्य – “प्रचिती मॅडम, उद्या पासून तुम्ही इथे नसणार…ही रंगिबेरंगी फुले तुम्हाला खूप मिस करणार..एकदा नदीकाठी जाऊन येऊया का?… आठवडाभरात आम्हाला सगळ्यांना तुमची खरंच खूप सवय झाली…” प्रचिती – “अच्छा..फक्त ही फुलेच मिस करणार का मला…मलाही या फुलांची खूप आठवण येईल म्हणून …

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग चौथा Read More »

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा

अजिंक्य आणि प्रचिती नदीकिनारी पोहोचले. संथ वाहणारे नदीचे पाणी, आजुबाजुच्या झाडांवर पक्ष्यांची किलबिल, मंद वाहता गार वारा, वर निळेशार आकाश असं रम्य वातावरण बघताच प्रचिती मनोमन सुखावली. प्रचिती – “काय मस्त वाटतंय ना इथे..इतक्या जवळून पहिल्यांदाच नदी बघते आहे मी..आय जस्ट लव्ह इट..” तिने लगेच बॅग मधून कॅमेरा काढला आणि ते निसर्गसौंदर्य कॅमेरात कैद केलं. …

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग तिसरा Read More »

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग दुसरा

दारात अजिंक्य ची आई हातात ताट घेऊन उभी.. प्रचिती ने आईंना बघताच तिला जणू लक्ष्मीचा भास झाला.. उंचपुरा बांधा,नीट नेसलेली बारीक किनार असलेली कॉटनची साडी, कपाळावर इवलिशी   लालचुटुक टिकली, दोन्ही खांद्यावर पदर, हातात आरतीचे ताट आणि प्रसन्न हसरा चेहरा. त्यांनी प्रचिती ला दारातच ओवाळून भाकरीचा तुकडा तिच्या अंगावरुन उतरवून दाराच्या बाजुला टाकला आणि हसतमुखाने …

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा) भाग दुसरा Read More »

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा)- भाग पहिला

“प्रचिती, अगं जाशील ना बरोबर तू एकटी? नाही म्हणजे अगदीच ग्रामीण भागात पहिल्यांदाच जाते आहेस ना म्हणून जरा काळजी वाटली..त्यात तिथे आठवडाभर राहणार, तेही परक्या घरी.. खाण्यापिण्याची नीट सोय होणार की नाही काय माहीत..” प्रचिती ची आई तिला काळजीच्या सुरात प्रश्न विचारत होती. “डोन्ट वरी माय डियर मॉम…मी अगदी व्यवस्थित जाऊन परत येते.. आणि तुला …

फुलराणी ( आगळीवेगळी प्रेमकथा)- भाग पहिला Read More »

अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा

“समिधा…..समिधा……समिधा, अगं लक्ष कुठे आहे तुझं..मी काय विचारतेय? चहा घ्यायला जायचं ना? कोणत्या विश्वात रमली आज ऑफिसला आल्या आल्या..चल पटकन..” समिधा ची मैत्रिण प्रिया तिच्या खांद्यावर हात ठेवून आवाज देत म्हणाली. प्रियाच्या आवाजाने भानावर येत दचकून समिधा म्हणाली, “अ..हो..हो..जाऊया ना..चल… अगं नकळत विचारांमध्ये अशी गुंतले की कळालच नाही तू कधी आलीस ते..” दोघीही चहा घ्यायला …

अन् पुन्हा नव्याने फुलला संसार…#प्रेमकथा Read More »

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग अंतिम

अमन डायरी हातात घेऊन नदी किनारी गेला. नदीचे पाणी स्थिर पणे वाहत होते, आजुबाजूला दुरवर पसरलेली झाडे अमन बघत होता. त्याला या किनाऱ्यावरची आरती सोबतची भेट आठवली. तिच्या आई सोबत तर कधी एकटीच ती या नदी किनारी कपडे धुवायला यायची. अशीच एकदा एकटी आलेली तेव्हा अमन घरच्यांच्या लपून छपून तिला भेटायला नदीवर गेलेला. गुलाबी रंगाचा …

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग अंतिम Read More »

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग दुसरा

     अमन आणि आरती एकाच वयाचे. आरती दिसायला सुंदर, उजव्या गालावर पडणारी तिची खळी कुणालाही वेड लावणारी. गव्हाळ वर्ण, लांबसडक केस, साधं सरळ राहणीमान असलेली आरती अमनची बालपणीची मैत्रीण, दोघे दिवसभर एकत्र खेळायचे या अंगणात.  लहान असताना कधी मामांसोबत शेतात बैलगाडी सफर करायचे तर कधी मामा, आरतीचे बाबा यांच्यासोबत नदीवर पोहायला जायचे. प्रत्येक सुट्टीला आजोळी …

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग दुसरा Read More »

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला

       अमन बर्‍याच वर्षांनी आज आजोळी आलेला. आजोळी आता आजी आजोबा नसले तरी दोन मामा मामी, भावंडे असं एकत्र कुटुंब. गावाच्या मधोमध प्रशस्त घर, चहुबाजूंनी अंगण त्यात फुलाफळांची झाडे. अमन‌ बालपणी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचाच पण जसजसे दहावी नंतर शिक्षण सुरू झाले तसे त्याचे येणे जाणे बंदच झालेले. आता कॉलेज संपले, नोकरीची ऑफर हातात होती …

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला Read More »

Free Email Updates
We respect your privacy.