Love Stories

Short Love stories in Marathi.

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला

       अमन बर्‍याच वर्षांनी आज आजोळी आलेला. आजोळी आता आजी आजोबा नसले तरी दोन मामा मामी, भावंडे असं एकत्र कुटुंब. गावाच्या मधोमध प्रशस्त घर, चहुबाजूंनी अंगण त्यात फुलाफळांची झाडे. अमन‌ बालपणी प्रत्येक सुट्टीला इकडे यायचाच पण जसजसे दहावी नंतर शिक्षण सुरू झाले तसे त्याचे येणे जाणे बंदच झालेले. आता कॉलेज संपले, नोकरीची ऑफर हातात होती …

आभास तुझा ( एक रहस्यकथा ) – भाग पहिला Read More »

तू आणि तुझं प्रेम हवंय…

     मोहीनी हॉस्पिटलमध्ये शुभमच्या शेजारी बसून त्याच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत पश्चात्तापाचे अश्रू ढाळत होती. शुममच्या चेहऱ्यावर जरा खरचटले होते, हाता पायाला चांगलाच मार लागला होता. किती वेदना होत असेल शुभमला या विचाराने मोहीनी अजूनच अस्वस्थ झाली होती. औषधांमुळे शुभमला कशीबशी झोप लागली होती.      मोहीनी आणि शुभम यांचा प्रेमविवाह. कॉलेजमध्ये दोघेही एकमेकांचे चांगले मित्र …

तू आणि तुझं प्रेम हवंय… Read More »

ओढ मिलनाची…( प्रेमकथा)

पहाटे पाचचा गजर झाला तशीच स्वरा लगबगीने उठून आवरायला लागली. आज खूपच उत्साहात होती स्वारी, कारणही तसेच होते. तब्बल सहा महिन्यांनंतर ती मयंकला भेटणार होती. आठ वाजता मयंक पोहोचणार तेव्हा त्यापूर्वी तयार होऊन एअरपोर्टवर जायचा तिचा प्लॅन होता. आंघोळ करून आली तशीच ओल्या केसांना सुकवत स्वतः ला आरशात निरखून बघताना तिला त्यांच्या लग्नानंतर मयंक सोबतची …

ओढ मिलनाची…( प्रेमकथा) Read More »

तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की विनय ने मोनाला भेटायला बोलावले. त्याला मानसी च्या वाढदिवस साठी काही तरी खास प्लॅन करायचा होता आणि त्यात मोनाची मदत हवी होती. मोनाला विनय आवडायचा त्यामुळे तिला वाटले की तो तिला प्रपोज करणार आहे. तेव्हा मनोमन ती आनंदी झाली होती. त्याला भेटल्यावर तिला जेव्हा कळाले की विनयला मानसी आवडते आणि …

तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग दुसरा ( अंतिम) Read More »

तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला

       मानसीचा आज पहिलाच दिवस होता कॉलेजमधला. कॉलेजच्या भल्या मोठ्या इमारतीचे निरीक्षण करताना ती एका वेगळ्या विश्वात रमलेली तितक्यात एक वाक्य कानावर पडले. “हाय मानसी..!” या अनोळखी कॉलेजमध्ये माझं नावं घेत कुणी हाक  मारली असावी या विचाराने गोंधळून तिने मागे बघितले तर मागे विनय उभा होता. विनय आणि मानसी शाळेत एकाच वर्गात होते पण …

तुझे याद ना मेरी आई….( प्रेमकथा ) भाग पहिला Read More »

स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा )

     मीरा खिडकीतून बाहेर लुकलुकणारे चांदणे बघत होती. माधवला यायला उशीर झाला त्यामुळे त्याची वाट बघत खिडकीतून डोकावून बघताना नकळत चांदण्यात रमली. जरा वेळ तो चांदण्यांचा लपाछपीचा खेळ बघून भरकन खोलीत गेली, एक कोरा करकरीत कागद आणि बॅगेतून काढलेले काही रंग, ब्रश घेऊन खिडकीजवळ स्थिरावली. समोरचे डौलदार कडूनिंबाचे झाड, त्या झाडांच्या फांद्यांमधून डोकावणारा चंद्र, आकाशात …

स्वप्नातील चांदवा ( प्रेमकथा ) Read More »

फुलले रे क्षण माझे ( प्रेमकथा )

रुपा आज अगदीच उत्साहात होती. कारणही तसेच होते, तिच्या स्वप्नातला राजकुमार आज तिला भेटणार होता. परी कथेतल्या राजकुमाराची स्वप्न बघणारी रुपा दिसायला अतिशय सुंदर, सुडौल बांधा, लांबसडक केस, निळसर डोळे, गालावर खळी. नावाप्रमाणेच रुपवान, अगदीच लाडात कौतुकात वाढलेली. गावात मोठा वाडा, एकत्र कुटुंब, त्यात आजी आजोबा, आई बाबा, दोन काका काकू, एकूण सहा भाऊ आणि …

फुलले रे क्षण माझे ( प्रेमकथा ) Read More »

सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम)

राघवला काय उत्तर द्यावे याचा विचार करत नेत्राच्या मनात झालेला गोंधळ काही कमी होत नव्हता. काही उत्तर न देता ती कॉलेजनंतर आश्रमात परतली. माईंना आज तिच्या वागण्यात बराच बदल जाणवला. हसत खेळत राहणारी नेत्रा आज विचारात मग्न होती, चेहऱ्यावर एक काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी न राहावता माईंनीच तिला विचारले, “नेत्रा , कशाचा विचार करते …

सावरी सखी ( सामाजिक प्रेमकथा ) – भाग दुसरा (अंतिम) Read More »

सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला

नेत्रा लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलेली. दिसायला अगदीच साधारण, काळी सावळी पण उंच पुरी सुडौल बांधा असलेली. अभ्यासात हुशार, प्रेमळ, सोज्वळ स्वभावाची आणि त्यामुळेच अख्या  अनाथाश्रमात प्रत्येकाचे मन तिने जिंकले होते. सगळ्यांची लाडकी नेत्रा, प्रेमाने तिला सगळे तिथे ताई म्हणायचे. आपले आई-वडील कोण आहेत, आपण इथे कशे आलो याविषयी अनेक प्रश्न नेत्राला पडायचे पण कधी कुणाला विचारण्याची …

सावरी सखी ( प्रेमकथा ) – भाग पहिला Read More »

आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम )

रोहन पेशाने सिव्हिल इंजिनिअर, उंच पुरा रूबाबदार व्यक्तीमत्व असलेला अत्यंत हुशार पंचेवीशीतला मुलगा. एका छोट्याशा गावातील धरणाच्या कामाची मुख्य जबाबदारी रोहनवर सोपवण्यात आली होती आणि त्या निमित्ताने तो एका त्या गावात काही महिन्यांसाठी वास्तव्यास होता. गावात आला तसंच इंजिनिअर साहेब आलेत म्हणत गावकरी त्याच्या मागेपुढे होते, गावात प्रत्येकाला रोहन विषयी फार कौतुक वाटत होते. इतका …

आठवणीतील मीरा ( अव्यक्त प्रेम ) Read More »

सहवास तुझा ( एक प्रेमकथा )

रविवार असल्याने आज प्रिया घरीच होती. सायंकाळी चहाचा कप हातात घेऊन प्रिया बाल्कनीत जाऊन बसली तितक्यात दारावरची बेल वाजली. आता यावेळी कोण बरं आलं असेल असा विचार करत दार उघडले तर समोर एक मोठा हार्टच्या ♥️ आकाराचा गुलाबांच्या फुलांचा गुच्छ घेऊन कुणीतरी उभे होते. चेहऱ्यापुढे तो गुच्छ धरल्यामुळे कोण आहे हे तिला बघताक्षणी कळाले नाही. …

सहवास तुझा ( एक प्रेमकथा ) Read More »

पहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा )

आजची सकाळ नेहमीपेक्षा अगदीच वेगळी होती. रविवार असल्याने निनादला सुट्टी त्यामुळे मेघना जरा निवांत उठून आंघोळ करून नाश्ता चहा बनवायला ती स्वयंपाकघरात आली. निनाद अजूनही गाढ झोपेत होता. आज वातावरण जरा नेहमीपेक्षा वेगळे वाटत होते. जून महिन्याची सुरुवात त्यामुळे पावसाच्या आगमनाची चाहूल लागली होती. सकाळचे नऊ वाजले असले तरी ढगाळ वातावरण असल्याने पहाट असल्यासारखे भासत …

पहिला पाऊस आणि बहरलेले प्रेम… ( प्रेमकथा ) Read More »

चिंब भिजलेले…(प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी )

नैना धावपळ करीत रेल्वे प्लॅटफॉर्म वर पोहोचली पण बघते तर काय पावसामुळे प्लॅटफॉर्म गर्दीने इतके भरलेले की आता आठ वाजताची लोकल मिळण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. नैना ने चौफेर नजर फिरवली तर जो तो घरी पोहोचण्यासाठी लोकल येण्याच्या दिशेने बघत स्वतःची बॅग, पर्स सांभाळत लोकल पकडण्याच्या तयारीत. संततधार धो धो पाऊस सुरूच त्यामुळे वातावरण थंडगार …

चिंब भिजलेले…(प्लॅटफॉर्मवरची लव्ह स्टोरी ) Read More »

तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग दुसरा ( अंतिम)

मागच्या भागात आपण पाहीले की शिवानी आणि रोहित दोघे फॅमिली फ्रेंड असून घरच्यांच्या मदतीने दोघे लग्नाच्या विचाराने एकमेकांना भेटण्याचे ठरते. रोहीत वेळेत न पोहोचल्याने शिवानी रागारागाने घरी निघून जाते. त्याच्या फोनला सुद्धा उत्तर देत नाही. आता शिवानी चा राग शांत करण्यासाठी रोहीत मनात काही तरी प्लॅनिंग करायचे ठरवतो. आता पुढे. रोहीतने शिवानीला फोन मेसेज करून …

तू तू मैं मैं पण तरीही तू आणि मी ( प्रेमकथा ) – भाग दुसरा ( अंतिम) Read More »

Free Email Updates
We respect your privacy.